लाडकी बहीण योजनेतील जून महिन्याचा हप्ता का थांबला आहे? हप्ते न मिळालेल्या बहिणींसाठी काय उपाय आहेत?

Image
महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते. मात्र, जून महिन्याचा १२वा हप्ता अजूनही बर्‍याच बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही, ज्यामुळे या योजनेतील बहिणींमध्ये चिंता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. या लेखात, लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याविषयीची सध्याची स्थिती👇 लाडकी बहीण योजना नवीन अपडेट्स:- पुढील हप्ता कधी मिळणार 👇सर्वप्रथम लक्षात घ्या की, या योजनेतील प्रत्येक हप्त्याचे वितरण थेट शासनाकडून डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे केले जाते. जर डीबीटी प्रक्रियेत काही अडथळा आला, तर हप्ते थेट खात्यात जमा होऊ शकत नाहीत. जून महिन्याचा हप्ता अजूनही बर्‍याच पात्र बहिणींना मिळालेला नाही कारण डीबीटी प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. याशिवाय, काही बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक न झाल्यामुळे किंवा त्यांच्या पात्रतेबाबत अद्याप स्पष्टता न मिळाल्यामुळे हप्ते जमा होण्यास विलंब होत आहे. यामुळे, अनेक बहिणी "हप्ता का आला नाही?" असा प्रश्न विचारत आहेत. सध्या शासनाकडून अशी कोणतीही प्रक्रिया किंवा आद...

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला

वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे.


माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.
आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. *आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.* जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना.
त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले.

धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. *आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.

भारत देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. 

परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!