तिरंगा रॅली:- भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन.!
🇮🇳 भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन!
पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले...
*🇮🇳 ऑपरेशन सिंदूर:🇮🇳*
भारतीय लष्कराने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानात थेट घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या धाडसी कारवाईत लष्कराने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.
🇮🇳🇮🇳 तिरंगा रॅलीत सहभागी मंडळी:
🇮🇳 मा. ना. श्री. गिरीश महाजन, मंत्री जलसंपदा
🇮🇳खा. मा. श्रीमती स्मिताताई वाघ
🇮🇳आ. मा. श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा)
🇮🇳कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब
🇮🇳मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल
🇮🇳उत्साह पूर्ण रॅली🇮🇳
👉 ‘भारत माता की जय! जय हिंद!’ या घोषणांनी जळगाव शहर दणाणून गेले. नागरिकांनी देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला आणि भारतीय सुरक्षा दलांना सलाम केला..
Comments
Post a Comment