👉नेचरकिंग ड्रीप 👍नेचरकिंग ड्रीप हे एक अत्याधुनिक सेंद्रिय पोषक तसेच समुद्रातील अलगी शैवाळ व नैसर्गिक वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले मिश्रण आहे. हे नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित प्रगत व पोषक संतुलित खत तयार होण्यास मदत करते यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध व पिकाला आवश्यक असणारे ह्युमिक, १८ प्रकारचे अमिनो, सिवीड, फुलविक, नॅचरल एंजाइम्स, ऑरगॅनिक कार्बन व नैसर्गिकरित्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. यामुळे सर्व पिकांची वाढ जलद व मजबूत होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते.
👉नेचरकिंग ड्रीपचे फायदे*
१) पांढऱ्या व तंतुमय मुळांची वाढ होऊन मुळांची शक्ती वाढते.
२) फुटव्यांची संख्या वाढवून त्यांची वाढ जोमदार होते.
३) फळांचा आकार व फळ धारणेत वाढ करून फुलांचा आकार व फुल धारणेत वाढ करते तसेच पिकांची शाखीय वाढ होते.
४) सर्व पिकासाठी आळवणी किंवा ड्रीप मधून दिल्यास पांढऱ्या मुळांची वाढ होऊन फुटव्यांची संख्या व जाडी वाढते त्यामुळे पेरांतील अंतर, पेरांची संख्या व पेरांची जाडी वाढण्यास मदत होते.
५) हरित द्रव्याचे प्रमाण वाढून अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.
६) जमिनीतील ह्युमस आणि सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढून जमीन सुपीक बनते तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
७) पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढवून पीक निरोगी ठेवण्यास मदत होते.
८) जमिनीची सुपीकता वाढते तसेच जमिनीतील उपयोगी सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.
९) नेचरकिंग ड्रीप हे कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्यासोबत वापरता येते.
१०) सर्व प्रकारच्या पिकांवर ड्रिप मधून, आळवणी द्वारे व पाठ पाण्याने देता येते.
*नेचरकिंग ड्रीप वापरण्याचे प्रमाण*
१ ते २ लीटर प्रती एकर पिकांच्या वाढीनुसार ड्रीपमधून आळवणीद्वारे पाटपाण्यातून जमीनीत
👉नेचरकिंग टॉप
नेचरकिंग टॉप हे सर्व पिकांच्या भरघोस वाढीसाठी नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले उच्च केंद्रित सेंद्रिय पोषक घटकांचे एक अनोखे मिश्रण आहे. या उत्पादनामध्ये सर्व पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूक्ष्म घटकांची सामग्री जलद वाढणाऱ्या पोषक सेंद्रिय फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये नैसर्गिक रित्या आवश्यक असणारे १८ प्रकारचे अमिनो, सीविड, प्रोटीन्स, सायटोकायनिन्स, विटामिन्स, नॅचरल मिनरल्स आहेत. यामुळे सर्व पिकांची नैसर्गिक रित्या जलद व मजबूत वाढ होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते.
👉नेचरकिंग टॉपचे फायदे
१) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे पिकांची वाढ निरोगी व जोमदार होते.
२) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते व शाखीय वाढ होते.
३) हरितद्रव्याचे प्रमाण वाढवून पेशी विभाजनाची प्रक्रिया चांगली करते.
४) पानांची काळोखी, पानांची रुंदी, पानांची उंची व तजेलदारपणा वाढवते.
५) प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते तसेच पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
६) अधिक फुलधारणेसह फुल व फळगळ रोखते व मादी फुलांच्या विकासामुळे फळ धारनेचे प्रमाण वाढते.
७) फळांचे वजन, आकार, रंग व चकाकी वाढवते.
८) सर्व पिकांसाठी उपयुक्त, फळभाज्या, पालेभाज्या, सोयाबीन, तूर, कापूस, हळद,आले (आद्रक),केळी,पपई,गहू, हरबरा, ज्वारी, कांदा, ऊस, मका, राजमा, भात म्हणजे सर्व पिकावर फवारणी केल्यास पानांची रुंदी, काळोखी, उंची वाढते त्यामुळे पेरातील अंतर, पेरांची संख्या व पेरांची जाडी वाढण्यास मदत होते.
९) नेचरकिंग टॉप ची फवारणी कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्यासोबत करता येते.
१०) नेचरकिंग टॉप ची फवारणी सर्व प्रकारच्या पिकांवर करता येते.
नेचरकिंग टॉप वापरण्याचे प्रमाण
३ ते ५ मिली प्रती लिटर पाण्यातून पिकांच्या
वाढीनुसार फवारणी करावी.
Comments
Post a Comment