श्रीमती स्मिता ताईंना संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर..! जाणून घ्या ह्या वर्षीचे महाराष्ट्र राज्यातील संसदरत्न पुरस्कार पाप्त खासदार?
ह्या वर्षीही महाराष्ट्र राज्याने संसदेत आपली छाप सोडली प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५ खासदार स्मिता ताईंना जाहीर झाला आहे. संसदेत केलेल्या कामगिरीची दखल घेत ताईंना हा सन्मान मिळणं, ही स्मिता ताईनं साठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
या गौरवाच्या क्षणी महायुतीचे सर्व आमदार, पक्षश्रेष्ठी, सहकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी तसेच ज्ञात अज्ञात मदत करणारे सर्व हितचिंकाचे आभार..
संसदीय कामकाजात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिलं आहे.
यंदाही महाराष्ट्राने आपली छाप उमटवत संसद भवन गाजवले. सुप्रिया सुळे ,श्री.श्रीरंग बारणे,श्री. अरविंद सावंत, श्री नरेश म्हस्के, डॉ.मेघा कुलकर्णी,वरर्षा गायकवाड हे संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत त्यांनाही हा पूरस्कार मिळाल्याचा ताईंनी आनंद होत आहे असे म्हटले.
हा सन्मान मला जनतेच्या आणि पक्षाच्या भूमिका संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल.
हा पुरस्कार म्हणजे केवळ ताईंच्च्या वैयक्तिक प्रयत्नांची पावती नाही, तर तो ताईंच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या अमर्याद विश्वासाचे, आशीर्वादाचे आणि पाठिंब्याचे प्रतीक आहे. त्यांच्या आशा-अपेक्षा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिल्या आहेत. त्यामुळे हा गौरव ताई त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला, कार्यकर्त्याला आणि हितचिंतकाला समर्पित करत आहे.

Comments
Post a Comment