शेतीविषयक विविध प्रलंबित मुदयांवर आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बँकर्स बैठक घेण्यात आली..!
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स बैठक
शेतीविषयक विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा
ह्या महत्वपूर्ण बैठकीत शेतीविषयक पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली..
* 1 पिक कर्ज वितरणातील प्रगती
* 2 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)
* 3 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
* 4 किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांची निकड..!
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बँकर्स बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांबाबत बँकांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचवणे, सहकार्य व समन्वयाने कार्य करणे आणि जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.
Comments
Post a Comment