महावितरणाबाबत रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक..!

RDSS योजनेतील कृषी फीडर विभक्तीकरण प्रगतीचा आढावा-महावितरणसह बैठक

कृषी पंपांना अखंडित व नियमित वीजपुरवठा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या RDSS (Revamped Distribution Sector Scheme) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण कामांची प्रगती वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली.



ही बैठक मा. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.

या बैठकीस महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, योजनेचे संबंधित कार्यकारी अभियंते व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली:-👇👇

जिल्ह्यातील कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्पाची सद्यस्थिती व पूर्णत्व टक्केवारी

उर्वरित कामांचा कालबद्ध आराखडा

प्रत्येक तालुक्यांतील अडथळे आणि त्यावरील उपाययोजना

शेतकऱ्यांना लाभ पोहोचण्यासाठी यंत्रणांचे समन्वय

मा. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की,
👉 कामांना आवश्यक त्या ठिकाणी गती द्यावी
👉स्थानिक प्रशासन व जनप्रतिनिधींशी समन्वय साधावा
👉निश्चित मुदतीत काम पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा.

जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

महत्वाचे: या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ठराविक वेळेत आणि प्रभावी स्वरूपात वीज मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला