सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा.!रोजगार हमी योजनेबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक!माहिती पूर्ण वाचा..
🌾 शेतकरी बांधवांनो, भविष्याची शेती तुमच्या हातात!
जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन
✅ "एक पीक नाही – दोन पीक एकत्र!"
➡️ मुख्य पिकाबरोबर आंतरपीक घ्या.
➡️ उत्पन्न वाढवा, जमिनीचा सर्वोत्तम उपयोग करा!
➡️ हरभरा, उडीद, तूर, मका यासारखी जोडपीक योजना त्वरित राबवा.
✅ "जिथे पाणी साठा – तिथे जलतारा!"
➡️ शेतात जलसंवर्धनासाठी जलतारा प्रकल्प राबवा.
➡️ पाण्याचा योग्य वापर म्हणजे जास्त उत्पादन, जास्त नफा!
➡️ साग, नीलगिरी, केळी, ऊस यासारख्या नियोजनबद्ध जलसिंचन पद्धती स्वीकारा.
✅ "बांधावर लावा बांबू!"
➡️ शेताच्या बांधावर बांबूची लागवड करा.
➡️ मातीचे संरक्षण + हरित पट्टा + टिकाऊ उत्पन्न = शाश्वत शेती!
➡️ जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध आहे.
✅ "किसान क्रेडिट कार्ड - तुमचा आर्थिक आधारस्तंभ!"
➡️ बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज, विमा संरक्षण आणि त्वरित निधी!
➡️ पेरणीपूर्वीचा खर्च, खत, बियाणे, औषधे-सगळ्यासाठी एकच उपाय.
➡️ आपल्या नजीकच्या बँकेत, CSC किंवा सेतू केंद्रात त्वरित अर्ज करा!
👉 शेतकरी मित्रांनो,
ही केवळ सूचना नाही, तुमच्या शेतीच्या समृद्धीसाठीचा मार्ग आहे.
तुमच्या कृतीतूनच जलयुक्त, संपन्न आणि भविष्यदर्शी शेती घडेल.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रकल्पांना आवश्यक ते आर्थिक सहाय्य जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध आहे.
👉वेळ वाया घालवू नका-आजच कृती करा!
जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे.
Comments
Post a Comment